वरुड खुर्द येथे पालकांचे पानावले डोळे
सिल्लोड, (प्रतिनिधी) : आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहावे, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, संस्कारक्षम मुल्यांची रुजवणूक व्हावी, यासाठी दशसुत्रीनुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड खुर्द येथे शनिवार १४ फेब्रुवारी रोजी मातृपितृ पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होते. विद्यार्थ्यांनी आई वडील, आजी-आजोबा व गुरुजनांचे पूजन केले.
या प्रसंगी अनेकांची डोळे पानावली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड खुर्दच्या वतीने मातृपितृ पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. व्हॅलेंटाइनला फाटा देत पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण टाळण्यासाठी व आपली भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी शाळेच्या वतीने मातृपितृ पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यास गावकऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. उपस्थितीत मान्यवरांनी मनोगतातुन आई- वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक सज्जन टाकसाळे यांनी माय या कवितेचे भावनिक गायक केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
पालक ठाकरे यांनी वैदिक मंत्रोच्चारात मुलांनी आई वडील, आजी आजोबा व गुरुजनांचे पुजन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश थोरात, सरपंच दिपक कळम, उपसरपंच गुलाब मिरगे, चेअरमन मधुकर मिरगे, शिंदे बाबा, कृष्णा गाडेकर, पत्रकार गणेश शेळके, सुधाकर मिरगे, मधुकर मिरगे, गणेश थोरात, विमल जोगदंडे, वंदना जोगदंडे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन विजया चापे, आभार प्रदर्शन अनिता बोळेगावे यांनी केले.










